माहिती संकलनाचे काही बोलके अनुभव
विशेषत: माहिती गोळा करण्यासाठी गेल्यावर अनेक बरे वाईट अनुभव आले. त्यातल्या काही बोलक्या प्रतिक्रीया खालील प्रमाणे देत आहे.
१) कशाला हा नसता उपदव्याप करीत आहात?
२) आता ह्या असल्या जुनकट माहितीत कोणाला रस आहे?
३) आपणाला दुसरा एखादा चांगला उद्योग सुचत नाही का?
४) ह्या असल्या जुन्या पुराण्या माहितीचा काय उपयोग होणार आहे?
५) हा 'कुलवृत्तांत’ कधीतरी छापुन येणार आहे का.
६) ह्या असल्या ग्रंथात आता कोणाला रस उरला आहे.
७) हा आतिशय चांगला उपक्रम आहे व आम्ही शुभेच्छा देतो.
८) उपक्रम स्तुत्य आहे परंतु आम्हाला मदत करणे सध्यातरी शक्य नाही.
९) उपक्रम छान आहे व स्थानीय पातळीवर आपणाला मदत करु.
१०) उपक्रम सुदंर आहे व सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा आहे .
असो " व्यक्ती तितक्या प्रक्रूती" परंतु सर्वांगीण गोष्टीचा विचार करता बहुतांशी लोकांनी मदतीचाच हात पुढे केला व अनेकांनी आपल्या भावाबहिणीचे फ़ॉर्मस स्वत: भरुन आम्हाला सर्वतोपरी मदत केली.कित्येकांनी आमच्या बरोबर येऊन त्यांच्या विभागातील लोकांकडुन फ़ॉर्मस भरुन घेण्यास मदत केली.
माहिती मिळविण्यासाठी पत्र व्यवहार व प्रवास-
बरीचशी माहिती प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मिळविण्यात आली समोरासमोर बसुन फ़ॉर्मस भरुन घेण्यात आले अर्थातच आज आमच्याकडे जवळजवळ २०० हुन आधिक फ़ॉर्मस आले व त्यांची माहिती ह्या कुलवृत्तांत प्रकाशित करण्यात येत आहे विशेषत:माहिती गोळा करणारे सर्व सद्स्य आपआपल्या व्यवसाय सांभाळुन हे सर्व काही करत होते.त्यासाठी कोणी किती वेळ खर्च केला व कोणी किती पेसे खर्च केले त्याला पारावर नाही. बहुतांशी हे सर्व खर्च सदस्यांनी आपल्या खिशाला चाट मारुन केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सर्व सभा सदस्यांच्या घरीच होत असत आणि विशेषत चहा पानाची व्यवस्था व खाण्याची व्यवस्था सदस्यांच्या घरातील स्त्रिया अत्यंत आपुलकीने व प्रेमाने करत तसेच आम्ही सर्वाना ह्या कामाला वाहुन घेतल्यानंतरही ह्या आमच्या करमरकर भार्यानी आम्हा सर्वांना योग्य ती मदतच केली व झालेला कोणताही त्रास व उपद्र्व हा जणु काही झालाच नाही किंवा होतच नाही अशा प्रकारची भावना ठेवली.
कुलवृत्तांतील माहितीचे स्वरुप व महत्त्व-
प्रत्येक पिढीतील व्यक्तीची माहिती देताना खालीलप्रमाणे गोष्टीवर भर देऊन, माहिती संकलित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.त्याचा फ़ायदा वेगवेगळ्या वेळी आपणा सर्वांना होईल अशी आमची खात्री आहे.
१) व्यक्तीचे नांव, त्याचे शिक्षण, व्यवसाय, समाज कार्य व इतर छंद तसेच त्याने मिळविलेले विशेष प्राविण्य ह्याचाही उल्लेख जेथे उपलब्ध होता तेथे देण्यात आला आहे.
२) स्त्री पुरुषांच्या समानतेच्या युगात स्त्रियांची माहितीही पुरुषांच्या बरोबरीने देण्यात आली आहे. मला वाटते करमरकर स्त्रिया हा कुलवृत्तांत वाचुन नक्कीच खुष होतील.
३) विवाहाच्या तारखा जेथे मिळाल्या आहेत तेथे जरुर दिल्या आहेत.त्यावरुन स्त्री पुरुषांच्या विवाहाच्या वाढत्या वयाच्याआलेखही आपणाला काढता येईल.
४) जन्म ठिकाणे देण्यात आली आहेत त्यावरुन स्थलांतरे कशी कशी होत गेली ह्याचाअंदाज आपणाला बांधता येईल.
५) आपल्या मुख्य घराण्यांबद्दल जी आधिक माहिती उपलब्ध झाली ती तसेच कुलदेवता ग्रामदेवता कुलाचार व वाषिक सणवार ह्याची
माहितीही विस्तृतपणे देण्यात आली.
६) सध्याच्या उपलब्ध पत्ता देण्यात आला ज्याद्वारे आपणाला इतर कुल बांधवांशी संपर्क साधणे सहज शक्य होईल तसेच व्यवसायानिमित्त वा कामानिमित्त आपण नवीन ठिकाणी गेल्यास तेथील कुलबांधवाशी जवळीक साधता यावी हाही त्यामागचा हेतु साध्य होईल.
७) प्रासिध्द झालेल्या कुलवृत्तांताची यादी देण्यात आली आहे.त्यावरुनआपल्याकुल बांधवाना इतर नातेवाईकांसंबंधी आधिक हवी असल्यास संदर्भग् रथ म्हणुनपाहता येईल.
|